Tarun Bharat

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठी बातमी : लवकरच येणार हे नवीन फीचर

Advertisements

व्हॉट्सअ‍ॅप देणार मेसेज एडिट करण्याची सोय : पाठवलेला मेसेज करता येणार एडिट

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मेसेजिंग अ‍ॅप आहे.अगदी ऑफिसचे काम असो वा ऑनलाईन क्लास, सर्वकाही व्हॉट्सअ‍ॅपवरून केले जाते. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स येत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅप लवकरच मेसेज एडिटींगचं फीचर आणणार आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर एडिट बटणाबाबत चाचणी केली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकिंग वेबसाइट Wabetainfo ने याबाबतची माहिती दिली आहे. पाच वर्षांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने या फीचरवर काम करायला सुरुवात केली होती. पण त्यानंतर मध्येच कंपनीकडून या फीचरवरील काम बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पाच वर्षांनंतर व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा एडिट फीचरवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेला मेसेज सिलेक्ट केल्यानंतर कॉपी आणि फॉरवर्ड पर्यायांसोबतच वापरकर्त्यांना एडिट हा पर्याय देखील उपलब्ध होणार आहे. या एडिट पर्यायाच्या माध्यमातून पाठवलेला मजकूर, टायपिंग करताना झालेली चूक दुरुस्त करता येणार आहे. सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एकदा पाठवलेला मेसेज केवळ डिलीट करू शकतो पण तो एडिट करू शकत नाही.

व्हॉट्सअ‍ॅपकडून सध्या बीटा व्हर्जनवर या फीचरची चाचणी केली जात आहे, असे संबंधित अहवालात म्हटले आहे. व्हॉट्सअ‍ॅप iOS आणि डेस्कटॉपसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये देखील अशीच वैशिष्ट्ये असणार आहेत. पण याचा अधिक तपशील नंतर उपलब्ध होईल.

Related Stories

चीनी सीमेवर सैन्य विनाशस्त्र कोणी आणि का पाठवले? : राहुल गांधींचा सवाल

Rohan_P

Kolhapur Rain: पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

Abhijeet Khandekar

जम्मू-काश्मिरच्या दहा जिह्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरू

prashant_c

भाजपच्या नेत्यांनी ‘ते’ पुस्तक मागे घ्यावे : संजय राऊत

prashant_c

जागतिक दूरसंचार दिन विशेष २०२२ । World telecom day 2022

Nilkanth Sonar

… तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल : मुख्यमंत्री ठाकरे

Rohan_P
error: Content is protected !!