Tarun Bharat

केंद्रीय कर्मचाऱयांना सरकारकडून नवी भेट

एचबीएच्या व्याजदरात कपात

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

एकीकडे सर्वसामान्य लोकांच्या गृहकर्जावरील व्याजदर वाढवून ईएमआयचा आकडा फुगत चालला आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱयांना स्वस्त गृहकर्जाचा लाभ देण्यात येत आहे. केंद्र सरकारने 2022-23 आर्थिक वर्षासाठी हाउसिंग बिल्डिंग ऍडव्हान्स (एचबीए) वरील व्याजदर कमी केले आहेत. शहरी विकास मंत्रालयाने एचबीएवरील व्याजदर कमी करत 7.1 टक्के केला आहे.

केंद्र सरकार हाउसिंग बिल्डिंग ऍडव्हान्सवरील व्याजदर 10 वर्षांच्या शासकीय रोख्यांच्या परताव्याच्या आधारावर निश्चित करते. 2021-22 मध्ये केंद्रीय कर्मचाऱयांसाठी एचबीएवरील व्याजदर 7.9 टक्के होता. परंतु आता हा दर कमी करत 7.1 टक्के करण्यात आला आहे. हाउसिंग बिल्डिंग ऍडव्हान्स घेत केंद्रीय कर्मचारी स्वतःच्या घराची निर्मिती करू शकतात.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी आणि हाउसिंग बिल्डिंग ऍडव्हान्स 2017 च्या नियमांनुसार केंद्रीय कर्मचारी स्वतःच्या 34 महिन्यांच्या मूळ वेतनाइतकी किंवा कमाल 25 लाख रुपयांपर्यंत रक्कम नवे घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी ऍडव्हान्स म्हणून मिळवू शकतो. हाउसिंग बिल्डिंग ऍडव्हान्स नियमानुसार कर्जाची मुद्दल पहिल्या 15 वर्षांमध्ये 180 ईएमआयमध्ये फेडावी लागते. तर कर्जावरील व्याज 5 वर्षांमध्ये 60 ईएमआयमध्ये फेडावे लागते. हाउसिंग बिल्डिंग ऍडव्हान्सद्वारे बँकेकडून घेण्यात आलेले गृहकर्जही फेडता येते.

Related Stories

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर साधला

Patil_p

‘आयएएस’ पूजा सिंघल सेवेतून निलंबित

Amit Kulkarni

उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांच्या बदल्या

Patil_p

नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात भारतीय ठार

datta jadhav

पाच वर्षाच्या विहानने एकट्याने केला दिल्ली ते बंगळूरू विमानप्रवास

Omkar B

ममता बॅनर्जी यांच्यावर 24 तासांची प्रचारबंदी

Patil_p