Tarun Bharat

न्यू हय़ुंडाई वेन्यू 2022 दाखल

सुरक्षेसाठी 6 एअर बॅग्ज : 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

न्यू हय़ुंडाई वेन्यू 2022 फेसलिफ्ट या मॉडेलला कंपनीने गुरुवारी दाखल केले आहे. हय़ुंडाई वेन्यूला प्रथमच 2019 मध्ये सादर केले होते. तीन वर्षांनंतर मात्र वेन्यू मॉडेल पहिल्यांदाच अपडेट केले होते. यातील डिझाईन आणि स्टाईलमध्ये विविध बदल करण्यात आले आहेत. या बदलासोबतच अपडेटेड फिचरसह स्मार्ट फिचरची कार बाजारात दाखल केली असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.

यामध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळणार आहे. 6 एअरबॅगसोबत वेन्यूमध्ये अधिकच्या सुरक्षा फिचर्स उपलब्ध करुन दिल्या आहेत. कंपनीच्या माहितीनुसार वेन्यू या मॉडेलची आतापर्यंत जवळपास 3 लाख इतकी विक्री करण्यात आली आहे आणि हय़ुंडाईच्या एसयुव्ही विक्रीमध्ये वेन्यूचा वाटा हा जवळपास 42 टक्क्यांवर राहिला होता.

सदरची कार ही ग्राहकांसाठी 7 रंगामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये टायफून सिल्वर, फॅटम ब्लॅक, फेयरी रेड, डेनिम ब्लू, टायटन गे, पोलर व्हाईट आणि फेयरी रेड ब्लॅक रुफ डय़ूल टोन कलर्समध्ये उपलब्ध होणार आहे.

वेन्यू या मॉडेलची किंमत 7.53 लाख रुपयासह (सुरूवातीची किंमत) दाखल करण्यात आली आहे. यामध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन राहणार आहे. 1.0 लिटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन असणाऱया मॉडेलची किमत 9.99 लाख रुपये आणि 1.5 सीआरडीआय डिझेल इंजिन मॉडेलची किमत 9.99 लाख रुपये सुरुवातीला राहणार असल्याची माहिती आहे. यामध्ये एक्स शोरुम किंमत प्रत्येक राज्यात एक राहणार आहे. या गाडीकरीता बुकिंग अगोदरच सुरू झाले असून त्याकरीता 21,000 रुपये भरण्याची गरज आहे.

अन्य फिचर्स

  • स्मार्ट इलेक्ट्रिक सनरुफ
  • रिमोट क्लायमेट नियंत्रण
  • रिमोट दरवाजा लॉक-अनलॉक
  • रिमोट वाहनांचे स्टेट्स तपासणे
  • फाइंड माय कार
  • टायर प्रेशरबाबत माहिती
  • फ्यूल पातळीची माहिती
  • स्पीड बाबतचे संकेत

Related Stories

रॉयल इनफिल्डची ‘मीटीओर’ लवकरच

Patil_p

मारुतीची ‘जिम्नी’ 12 लाखांपर्यंत ?

Patil_p

मारुतीची ‘विटारा बेझा’ दाखल

tarunbharat

‘महिंद्रा’ने सादर केली नवी ‘बोलेरो निओ’

Patil_p

क्राटोस सिंगल चार्जवर 180 किमी चालणारी ई बाईक

Amit Kulkarni

ट्रीम्पची ‘बोनविले बॉबर’ मोटारसायकल बाजारात

Patil_p