देशभरातील 100 हून अधिक स्टॉलधारकां सहभाग : अत्यंत माफक दरात वस्तू उपलब्ध
बेळगाव : देशाच्या विविध भागात उत्तमोत्तम वस्तूंचे प्रदर्शन यशस्वी करून न्यू इंडियन क्राफ्ट्स एक्स्पो आता कुंदानगरी बेळगाव येथील सदाशिवनगर परिसरात लक्ष्मी कॉम्प्लेक्सशेजारी मंगळवार दि. 28 मार्चपासून सुरू झाले आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलित करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात देशभरातील 100 हून अधिक स्टॉलधारकांनी भाग घेतला आहे. हे प्रदर्शन ताज थ्रेड, हँडलूम गुड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि यश कम्युनिकेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, काश्मीर, शिमला, पंजाब, आसाम, अरुणाचल, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथील हस्तकला कारागिरांनी हातांनी बनविलेल्या वस्तू या प्रदर्शनात अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत. हँडमेड गिफ्ट्स, हँडमेड प्रॉडक्ट्स, ज्वेलरी, टेराकोटा होम डेकोर, खुर्जा क्रॉकरी, डिझाईनर क्लॉथ, वाराणसी साड़ी, कोलकाता, आसामी साड़ी व क्लॉथ, भागलपूर साडी, पंजाबी व राजस्थानी चप्पल, कार्पेट, पायपोस, हर्बल प्रॉडक्ट्स, होम फर्निशिंग बुक्स, शूज रॅक, काश्मिरी शाल व सूट, खादी कपड़ा, खादी हॅण्डलुम, गुजराती पर्स, किचन वेयर, सहारनपूर फर्निचर, राजस्थानी लोणचे, लाखेच्या बांगडय़ा, टी-शर्ट, मुलांची खेळणी, जयपुरी रजई, लेदर आयटम, बेडशीट, वूडन कार्विंग, मेटल क्राफ्ट, लेडिज कुर्ती, गाऊन, क्रॉकरी, बरण्या, आयुर्वेदिक उत्पादने, राजस्थानी चुरण, सॉफ्ट खेळणी, चन्नपटणा खेळणी, सौंदर्य प्रसाधने, गृह सजावटीचे साहित्य, हैद्राबादी बँगल्स, मोती, खवय्यांसाठी मसाले, लोणचे, पापड, चटण्या, विंडोज डोअर कर्टन्स, लेडिज गाऊन, मोबाईल कव्हर, शिवाय मैसूर हेअर ऑईल, तिरुपूर टी-शर्ट, पायजमा, ट्रक सूट, खेकडा बेडशीट्सच्या शेकडो व्हरायटीज अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत. संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी, असे हे प्रदर्शन 30 दिवस चालणार असून प्रदर्शनात प्रवेश व पार्किंगची मोफत सोय आहे. हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी याचे आयोजन केल्याची माहिती आयोजकांनी दिली. उपस्थितांचे स्वागत आशुतोष शर्मा यांनी केले. प्रकाश कालकुंद्रीकर यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी नगरसेवक सविता कांबळे यांच्यासह सविता हेब्बार, रक्षा उपाध्ये, सुहास तराळ व इतर मान्यवर उपस्थित होते.