नवे बदल येत्या 26 जुलैपासून लागू होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोशल मीडिया कंपनी मेटा (अगोदरचे फेसबुक) हे ग्राहकांसाठी नवीन पॉलीसी बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात नोटिफिकेशन पाठविण्यासाठी सुरुवात केली आहे. कंपनी नवीन नियमासह पॉलीसी येत्या 26 जुलैपासून लागू करणार असल्याची माहिती आहे.
मेटाने एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे, पुन्हा एकदा आपली पॉलिसी बदलणार असून ती समजण्यास आणि हाताळण्यास सोपी असणार आहे.
मेटाचे स्पष्टीकरण
फेसबुक, इंस्टाग्राम आणि मॅसेंजरवर ग्राहकांना मिळणाऱया सुचनांबाबतीत माहिती देणार आहे. त्याच्या क्षेत्रांमध्ये प्रासंगिक पॉलीसी आणि सेवासह नियम राहणार आहेत. सारांश रुपात यामध्ये पाहता येणार आहे. यासह सर्व बदलणारे नियम येत्या 26 जुलैपासून लागू होणार आहेत. कोणत्याही ग्राहकांनी काही कारणास्तव सेवांमध्ये व्यत्यय आल्यास तक्रारी करण्याची गरज भासणार नसल्याचे मेटाने नमूद केले आहे.