सर्वाधिक विक्री होणाऱया आल्टोचे होणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मारुती कंपनी भारतामध्ये ग्रॅड विटाराचे सादरीकरण केल्यानंतर कंपनी आपली सर्वाधिक विक्री होणाऱया आल्टोचे नवीन मॉडेल सादर करण्याच्या तयारीत आहे. यामुळे आगामी महिन्यात सादर करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. पहिल्यांदा वर्ष 2000 मध्ये आल्टो सादर करण्यात आली होती. या मॉडेलने चालू वर्षात देशात सर्वाधिक विक्रीचा टप्पा पार केला होता. 20 वर्षात कंपनीने आल्टोची 40 लाख पेक्षा अधिक कार विक्री केली आहे.
कंपनीकडून चाचणी सुरु
प्राप्त अहवालानुसार मारुतीने नवीन आल्टोची चाचणी सुरु केली आहे. तसेच त्याचे चित्रही प्रकाशित केले आहे. याचदरम्यान नवीन आल्टो इंजिनसह इतर काही बदल केले आहेत.
दोन इंजिनचा पर्याय
आल्टोच्या दोन आवृत्तींना अगोदरच सादर करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या डिझाईनसोबत यामध्ये दोन इंजिनचा पर्याय दिलेला आहे. यामध्ये के 10 सी 1.0 लिटरचे डबलजेट पेट्रोल इंजिन दिले आहे. यासह सीएनजी मॉडेलही येणार असल्याचे संकेत अधिक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.