भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता वाहन धारकांना आपल्या ड्रायव्हींग करतानाच्या वर्तनासोबत मोटार इन्शुरन्स पॉलीसीही खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) यांनी जनरल इन्शुरन्स कंपन्यांना ‘पे ऍज यू ड्राईव्ह’ आणि ‘पे हाउ यू ड्राईव्ह’ यासारख्या टेलीमॅटिक्सवर आधारीत मोटार इन्शुरन्स कव्हर सादर करण्यास मान्यता दिली आहे. विमाधारक आपली गाडी किती आणि कशी चालवतो, यावर आधारीत प्रीमियमचे पेमेन्ट करता येणार आहे.
यासोबतच वाहन धारकांकडे एकपेक्षा अधिक गाडय़ा असल्यास त्याचाही फ्लोटर मोटर इन्शुरन्स घेता येणार असून यासह हेल्थ इन्शुरन्स घेता येणार असल्याची माहिती आहे.
तीन नवीन ऍड ऑन जोडण्यास मान्यता
आयआरडीएआय यांनी जनरल इन्शुरन्स कंपन्यांना 3 नवीन ऍड ऑन जोडण्यास मान्यता दिली आहे. हा ऍड ऑन असून पे ऍज यू ड्राईव्ह, पे हाऊ यू ड्राईव्ह आणि फ्लोटर पॉलीसीही एकपेक्षा जादा दुचाकी आणि कारच्या एका मालकासाठी राहणार आहे.
जुन्या वाहनांसाठी थर्डपार्टी कव्हर
थर्ड पार्टी कव्हर आणि स्वतःचा मिळून एक व्यापक कव्हर होऊ शकतो. रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी एक थर्डपार्टी कव्हर अनिवार्य आहे.