Tarun Bharat

नवी प्रीमियम एडिशन चेतक इलेक्ट्रिक दुचाकी लाँच

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बजाज ऑटो कंपनीने भारतामध्ये आपली नवी चेतक प्रीमियम एडिशन इलेक्ट्रिक दुचाकी नुकतीच लाँच केली आहे. या गाडीची किंमत साधारणपणे दीड लाखापर्यंत असणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

नव्या 2023 च्या रूपामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अलीकडेच कंपनीने आपल्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत कमी करुन 1 लाख 21 हजार रुपये इतकी केली आहे. बजाज चेतक प्रीमियम एडिशन दुचाकीची किंमत ही 1 लाख 55 हजार रुपये असल्याचे समजते. नव्या इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग सुरू झाले असून या दुचाकीची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.


कंपनीने नव्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी क्षमतेमध्ये वाढ केली असून सदरच्या बॅटरीमुळे इलेक्ट्रिक दुचाकी 20 टक्के अधिक जादा मायलेज देऊ शकणार आहे. नवी बजाज चेतक प्रीमियम एडिशनची इलेक्ट्रिक दुचाकी एकदा चार्ज केल्यानंतर 108 किलोमीटरचे अंतर कापू शकणार आहे. सध्याच्या घडीला बाजारात असणाऱया चेतक दुचाकीचे मायलेज हे 90 किलोमीटर इतके आहे. नव्या दुचाकीमध्ये 3 किलो वॅटची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली असून चार्ज करण्यासाठी चार तासाचा अवधी लागणार आहे तर 80 टक्के इतकी बॅटरी चार्ज करण्यासाठी तीन तास लागू शकणार आहेत. 63 किलोमीटर प्रतितास इतक्मया वेगाने दुचाकी धावू शकणार आहे. सदरची नवी चेतक ही गाडी देशातील जवळपास 60 शहरांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

w किंमत दीड लाखापर्यंत

w 108 किलोमीटरचे मायलेज

w 60 शहरांमध्ये करता येणार खरेदी

w 3 रंगांमध्ये मिळणार

Related Stories

भारतात येणार जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

prashant_c

दुचाकीमध्ये हिरो स्प्लेंडरलाच पसंती

Patil_p

सरडय़ाप्रमाणे रंग बदलणारी लवकरच येणार कार

Patil_p

किया मोर्ट्सची विक्री 50 हजारच्या पुढे

Patil_p

टाटा मोटर्सची 1 लाखावी अल्ट्रोज दाखल

Patil_p

कारसाठी तब्बल 22 महिने प्रतीक्षा

Amit Kulkarni