Tarun Bharat

जीवन विमा कंपन्यांच्या नव्या प्रीमियमचे उत्पन्न 91 टक्क्यांनी वाढले

Advertisements

जुलै महिन्यातील आकडेवारी सादर : एलआयसीचा वाटा अधिकचा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

जीवन विमा कंपन्यांचे नवीन पॉलिसी प्रीमियम्सचे उत्पन्न जुलैमध्ये 91 टक्क्यांनी वाढून 39,078.91 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) यांनी ही माहिती जुलै 2022 चा डाटा सादर करताना दिली आहे.

एक वर्षापूर्वी जुलै 2021 मध्ये आयुर्विमा कंपन्यांचे नवीन प्रीमियम उत्पन्न 20,434.72 कोटी रुपये होते. गेल्या महिन्यात नवीन पॉलिसींमधून प्रीमियम उत्पन्न सर्वाधिक होणाऱया कंपन्यांमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)  चे 29,116.68 कोटी रुपये होते. वर्षभरापूर्वी याच महिन्यात, नवीन व्यवसायातून एलआयसीचे प्रीमियम उत्पन्न 12,030.93 कोटी होते.

मागील चार महिन्यातील आकडेवारी

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल-जुलै) या सर्व विमा कंपन्यांच्या नवीन व्यवसायातून एकत्रित प्रीमियम उत्पन्न 1,12,753.43 कोटी रुपये आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 73,159.98 कोटी रुपये होते. या चार महिन्यांत, नवीन व्यवसायातून एलआयसीचे एकूण प्रीमियम उत्पन्न 62 टक्क्यांनी वाढून 77,317.69 कोटी रुपये झाले.

विमा बाजारातील कंपन्यांचा वाटा

देशातील आयुर्विमा बाजारात एलआयसीचा सर्वाधिक 68.6 टक्के वाटा आहे. उर्वरित 23 इतर जीवन विमा कंपन्यांचे नवीन पॉलिसी प्रीमियम देखील या कालावधीत सुमारे 19 टक्क्यांनी वाढून 9,962.22 कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत तो 8,403.79 कोटी रुपये होता.

Related Stories

बाजारात सेन्सेक्स, निफ्टीची सकारात्मक वाटचाल

Amit Kulkarni

कोल इंडियाचे उत्पादन 62 कोटींसह विक्रमी टप्प्यावर

Patil_p

सॅमसंग गॅलक्सी टॅब बाजारात

Omkar B

डिसेंबरपर्यंत रेपो रेट 6 टक्के होणार

Patil_p

आरबीएल बँकेच्या समभागात घसरण

Patil_p

जूनमध्ये इएसआयसी योजनेत जोडले 15.47 लाख सदस्य

Patil_p
error: Content is protected !!