व्यवसायाची उलाढाल 5500 कोटींवर पोहचण्याचा विश्वास
वृत्तसंस्था/ मुंबई
गोदरेज अप्लायन्सेस कंपनीची उलाढाल 2022-23 आर्थिक वर्षामध्ये 5500 कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. यामध्ये 35 टक्के इतका वाटा हा उत्पादनांच्या विक्रीच्या माध्यमातून साध्य केला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे उत्पादन क्षमता वाढविण्यासाठीही खास प्रयत्न येत्या काळात केले जाणार आहेत. 200 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूकही कंपनी याकरिता करणार असून यामध्ये नव्या उत्पादनांची भर पाडली जाणार आहे. पुण्यातील शिरवळजवळ असलेल्या कंपनीच्या कारखान्यामधून उत्पादने तयार केली जाणार आहेत. कंपनीच्या विविध उत्पादनांना बाजारामध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचेही गोदरेज कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी म्हटले आहे.
प्रीमियम गटातील उत्पादनांसाठी 250 कोटी
प्रीमियम गटातील उत्पादनांसाठी कंपनीने अलीकडेच 250 कोटी रुपये इतके गुंतवले असल्याचेही नंदी यांनी स्पष्ट केले आहे. फ्रॉस्टफ्री रेफ्रिजरेटर, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, एअर कुलर आणि फ्रिज या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये नवी नवी उत्पादने सादर करण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे. कंपनीने 2021-22 आर्थिक वर्षामध्ये दोन हजार कोटींची कोटींची उलाढाल केली होती.