Tarun Bharat

1.8 कोटी उंदरांमुळे न्यूयॉर्क त्रस्त

उंदीर पळवून लावणाऱयांना मिळणार कोटय़वधींचे पॅकेज

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर उंदरांमुळे त्रस्त झाले आहे. अशा स्थितीत शहराला एका अशा तज्ञाची गरज आहे, जो उंदरांपासून मुक्ती मिळवून देऊ शकेल. न्यूयॉर्कमध्ये दर एका व्यक्तीमागे दोन उंदीर असल्याचा अनुमान 2014 साली व्यक्ती करण्यात आला होता. याचाच अर्थ शहरातील उंदरांची संख्या सुमारे 1 कोटी 80 लाख इतकी होती. उंदरांपासून मुक्तता मिळावी म्हणून न्यूयॉर्कचे प्रशासन एका तज्ञाला नियुक्त करू पाहत आहे, उत्तम उमेदवाराला याकरता 1 लाख 70 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 1 कोटी 13 लाख रुपयांचे मानधन मिळणार आहे.

न्यूयॉर्क प्रशासनाने याकरता रितसर वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशित केल्या आहेत. यानुसार अर्जदारांनी पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच अशा लोकांकडे उंदरांच्या विरोधात लढण्यासाठी दृढसंकल्प असणे आवश्यक आहे. चलाख अन् मोठय़ा प्रमाणावर असलेले न्यूयॉर्क शहरातील उंदीर स्वतः जिवंत राहण्याच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु हे शहर ते चालवत नाहीत तर आम्ही चालवितो असे या जाहिरातीत म्हटले गेले आहे.

कायद्यात बदल

2 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 2022 च्या पहिल्या 8 महिन्यांच्या कालावधीत उंदरांविषयीच्या 70 टक्क्यांपर्यंतच्या तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. उंदरांची दहशत रोखण्यासाठी नवे कायदेही सादर करण्यात आले आहेत. या कायद्यांनुसार न्यूयॉर्कच्या रहिवाशांना रात्री 8 पूर्वी स्वतःच्या घरातील कचरा बाहेर काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तर यापूर्वी संध्याकाळी 4 वाजल्यानंतर कधीही घरांबाहेर कचरा टाकला जात होता.

उंदरांबद्दल द्वेष

मला उंदरांबद्दल द्वेष वाटतो आणि आम्ही काही उंदरांना ठार करणार आहोत असे या विधेयकावर स्वाक्षरी करताना महापौर एरिक एडम्स यांनी म्हटले होते. प्रशासनाकडून निधीकपात करण्यात आल्याने यापूर्वी यंत्रणांना 4700 पदांची कपात करण्यास सांगण्यात आले होते, याच्या एक आठवडय़ाने नवी भूमिका घेत जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Related Stories

प्राण्यांशी बोलून मोठी कमाई

Patil_p

लायन्स क्लबच्या वतीने तिन्ही दलांच्या सैनिकांसमवेत राखीपौर्णिमा साजरी

Tousif Mujawar

रस्ता ओलांडण्यास मदत करणारा श्वान

Patil_p

इथे होतेय काळी हिमवृष्टी

Patil_p

सौरऊर्जेचा ‘पॉवर’फुल प्रयोग

Patil_p

दहा कोटीचा रेडा; एक कोटीचे उत्पन्न

Patil_p