ऑकलंड / वृत्तसंस्था
न्यूझीलंड क्रिकेटने गुरुवारी आगामी भारत दौऱयासाठी आपला अ संघ जाहीर केला. या संघात आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या 7 खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंड अ संघ सप्टेंबरमध्ये भारत दौऱयावर येणार आहे. न्यूझीलंड अ संघाने यापूर्वी 2017 मध्ये शेवटचा भारत दौरा केला. त्या दौऱयाप्रमाणेच यंदाही 4 दिवसांचे 3 व 3 वनडे सामने खेळवले जाणार आहेत. सेंट्रल स्टॅग्ज मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांच्याकडे प्रशिक्षणाची धुरा असेल. सीम गोलंदाजी अष्टपैलू हेन्री (कॅन्टर्बरी) व नॅथन स्मिथ (वेलिंग्टन) दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाहीत, हे यावेळी स्पष्ट झाले.
न्यूझीलंड अ संघ ः टॉम ब्रुस (कर्णधार), रॉबि ओडोनेल (द्वितीय कर्णधार), चॅड बोव्हेस, जो कार्टर, मार्क चॅपमन, डेन क्लिव्हर (यष्टीरक्षक), जेकब डफी, मॅट फिशर, कॅमेरुन फ्लेचर (यष्टीरक्षक), बेन लिस्टर, रचिन रविंद्र, मायकल रिपॉन, सीन सॉलिया, लॉगन व्हान बीक, जो वॉकर.