मेलबोर्न : आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बुधवारी गट 1 मधील न्यूझीलंड व अफगाण यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता या दोन्ही संघांना या सामन्यात प्रत्येकी एक गुण मिळाला आहे.
गट 1 मधील गुणतक्त्यात न्यूझीलंडचा संघ दोन सामन्यातून 3 गुणासह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने एक सामना जिंकला असून त्यांचा एक सामना वाया गेला आहे. न्यूझीलंड या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान आणि विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता. अफगाणने पदकतक्त्य़ात आपले खाते उघडले असून त्यांनी एक गुण मिळविला आहे. दोन सामन्यातून अफगाणचा संघ 1 गुणासह शेवटच्या स्थानावर आहे.