वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंड क्रिकेट संघातील अष्टपैलू डॅरिल मिशेल याला सरावावेळी दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी प्रशिक्षण सराव सुरू असताना मिशेलच्या उजव्या हातावर चेंडू आदळला. या दुखापतीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या उजव्या हाताचे हाड मोडल्याचे एक्स-रे मध्ये दिसून आले. या दुखापतीमुळे तो आगामी विश्वचषक टी-20 स्पर्धेत खेळण्याची शक्मयता दुरावली असल्याचे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने सांगितले. न्यूझीलंड क्रिकेट संघ या स्पर्धेसाठी 15 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला प्रयाण करणार आहे. या स्पर्धेत न्यूझीलंडचा सलामीचा सामना आता पंधरा दिवसांवर राहिला आहे. दरम्यान, मिशेलची ही दुखापत पूर्ण बरी होण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागणार असल्याने त्याला ही स्पर्धा हुकण्याची शक्मयता आहे.