येत्या 7 फेब्रुवारीपर्यंतच पदावर राहणार
वेलिंग्टन / वृत्तसंस्था
यावषी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱया निवडणुकांपूर्वी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी गुरुवारी पक्षाच्या वार्षिक बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. 7 फेब्रुवारीपर्यंत त्या पंतप्रधानपदावर राहणार असून त्यानंतर राजीनामा देतील. तत्पूर्वी 22 जानेवारीला त्यांच्या जागी पक्षाच्या नव्या प्रमुखाची निवड होणार आहे.
पंतप्रधान म्हणून आपला शेवटचा दिवस 7 फेब्रुवारी असेल, असे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी म्हटले आहे. 2023 ची सार्वत्रिक निवडणूक 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यापूर्वीच त्यांनी पंतप्रधानपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. या पदावर राहून जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याकडे आता ऊर्जा उरलेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. ‘पंतप्रधानपदी विराजमान व्यक्तीकडे नेतृत्व करण्यासाठी विशेष जबाबदारी लागते. ही भूमिका साकारण्यासाठी काय करावे लागते याची मला पूर्ण जाणीव असून आता माझ्यात या भूमिकेला न्याय देण्यासाठी पुरेशी ऊर्जा नाही’, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
भाषणावेळी झाल्या भावुक
नेपियरमधील लेबर पार्टीच्या कार्यक्रमात जेसिंडा आर्डर्न यांनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले. भाषणादरम्यान त्या भावूकही झाल्या होत्या. ‘मी पण माणूस आहे. माझ्या राजीनाम्यामागे कोणतेही रहस्य नाही. मला देशासाठी जेवढे करता येईल तेवढे केले. मी शक्मय तितका वेळही दिला. पण आता माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे’, असे जाहीर करताना त्यांच्या डोळय़ात पाणी आले होते.
देशाचे नेतृत्व करणे हे खूप अभिमानास्पद काम आहे. तसेच ते आव्हानात्मक आहे. अचानक आलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व संसाधने असल्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. गेली साडेपाच वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची वर्षे आहेत, असेही त्यांनी पुढे सांगितले.
वयाच्या 37 व्या वषी पंतप्रधान
जेसिंडा आर्डर्न यांचा जन्म 26 जुलै 1980 रोजी हॅमिल्टन येथे झाला. त्यांचे वडील रॉस आर्डर्न पोलीस अधिकारी आणि आई लॉरेल कुक होती. जेसिंडा यांना नेहमीच राजकारणात रस होता. म्हणूनच त्यांनी 2001 मध्ये वयाच्या अवघ्या 18 व्या वषी न्यूझीलंडच्या लेबर पार्टीमध्ये प्रवेश केला. तत्कालीन पंतप्रधान हेलन क्लार्क यांच्यासाठी त्यांनी संशोधक म्हणून काम केले होते. 2017 मध्ये वयाच्या 37 व्या वषी त्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान झाल्या. तेव्हापासून अनेक संकटे चांगल्या पद्धतीने हाताळल्यामुळे त्या खूप लोकप्रिय झाल्या होत्या.