पाठदुखीचा फटका, तूर्तास इंग्लंडकडे 2-0 फरकाने विजयी आघाडी
वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱयावर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत इंग्लंडने पहिले सलग दोन सामने जिंकून न्यूझीलंडवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. आता या मालिकेतील होणाऱया तिसऱया कसोटीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन पाठ दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
या मालिकेतील दुसऱया कसोटीत खेळाच्या तिसऱया दिवशी गोलंदाजी करताना 27 वषीय जेमिसनच्या पाठीमध्ये वेदना होऊ लागल्या. स्नायू दुखावल्याने त्याला या सामन्यात अधिक गोलंदाजी करता आली नाही. या दुखापतीवर तातडीने इलाज करून घेणे भाग असल्याने तो तिसऱया कसोटीत खेळू शकणार नाही, असे न्यूझीलंड संघाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. या शेवटच्या कसोटीसाठी जेमिसनच्या जागी ब्लेअर टिकनेर याला संघात संधी देण्यात येणार आहे. ही शेवटची कसोटी पुढील आठवडय़ात लीड्स मैदानावर खेळविली जाणार आहे. या दुसऱया कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडचा 5 गडय़ांनी पराभव करत मालिका यापूर्वीच आपल्या खिशात घातली. बेअरस्टो आणि स्टोक्स यांची फलंदाजी त्यावेळी निर्णायक ठरली.