वेलिंग्टन : न्यूझीलंड महिला संघाची उपकर्णधार ऍमी सॅटर्थवेट हिने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 2022-23 हंगामाकरिता क्रिकेट न्यूझीलंडने तिचा मध्यवर्ती करार श्रेणीत समावेश केला नाही. त्यानंतर सॅटर्थवेटने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
सॅटर्थवेट यापूर्वी 2018 व 2019 मध्ये किवीज महिला संघाची कर्णधार होती. तिने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर 15 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 111 टी-20 व 145 वनडे खेळले.
‘मध्यवर्ती करार मिळाला नाही, याची खंत आहे. मी अद्याप काही कालावधी खेळू शकले असते. पण, तरीही न्यूझीलंड क्रिकेट मंडळाच्या निर्णयाचा मला आदर आहे.