Tarun Bharat

न्यूझीलंडच्या टी-20 वर्ल्डकप जर्सीचे अनावरण

Advertisements

वृत्तसंस्था /वेलिंग्टन

ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघाने आपल्या नव्या जर्सीचे अनावरण केले. त्यांनी सोशल मीडियावरुन जर्सी फोटोशूट शेअर केले. डेव्हॉन कॉनवे, डॅरेल मिशेल, मार्टिन गप्टील, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट आदी खेळाडू या फोटोशूटमध्ये सहभागी झाले.

‘टी-20 वर्ल्डकपसाठी आम्ही आमच्या शर्ट्सचे आज अनावरण करत आहोत’, असे ब्लॅक कॅप्स न्यूझीलंडने इन्स्टाग्रामवर नमूद केले. शर्ट डिझाईनला रेट्रो लूक असून नव्वदीच्या दशकात किवीज संघ अशाच प्रकारचे कॉम्बिनेशन वापरत असे. ब्लॅक ग्रे व हेरिटेज ग्रे ही त्याची खासियत आहे. 1990 च्या दशकात न्यूझीलंड जर्सीमध्ये हेरिटेज ग्रे कलरचा प्राधान्याने समावेश होता. या शर्टमध्ये फर्नऐवजी सदर्न क्रॉसचा समावेश केला गेला आहे.

यापूर्वी, दि. 20 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडने या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आणि मार्टिन गप्टील विक्रमी सातव्यांदा ही स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज असेल, असे त्यातून स्पष्ट झाले. किवीज संघ यंदाच्या आपल्या आयसीसी टी-20 विश्वचषक मोहिमेला दि. 22 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीने सुरुवात करेल. त्यानंतर अफगाण व इंग्लंडविरुद्ध त्यांचे सामने होतील. न्यूझीलंडचा संघ 2021 मधील आवृत्तीत उपजेता ठरला. त्यावेळी त्यांना फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडचा संघ

केन विल्यम्सन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टील, ऍडम मिल्ने, डॅरेल मिशेल, जिम्मी नीशम, ग्लेन फिलीप्स, मिशेल सॅन्टनर, ईश सोधी, टीम साऊदी.

Related Stories

बडे खेळाडू युवा विश्वचषकातच घडतात

Patil_p

आजारी वडिलांसह ज्योतीचा 1200 किमी सायकल प्रवास

Patil_p

भारत वर्ल्डकपसाठी एका महिन्याची मुदत घेणार

Patil_p

तुर्कीतील स्पर्धेसाठी भारतीय टेनिस संघाची घोषणा

Patil_p

मियामी स्पर्धेतून सेरेनाची माघार

Patil_p

भारत-आयर्लंड यांच्यात आज पहिली टी-20

Patil_p
error: Content is protected !!