Tarun Bharat

टी-20 मालिकेत न्यूझीलंडची विजयी आघाडी

Advertisements

वृत्तसंस्था / किंग्जस्टन (जमेका)

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंड संघाने यजमान विंडीजवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. शुक्रवारी या मालिकेतील झालेल्या दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने विंडीजचा 90 धावांनी दणदणीत पराभव केला. न्यूझीलंडच्या फिलीप्सला सामनावीर घोषित करण्यात आले. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (रविवार दि. 14) याच ठिकाणी खेळविला जाईल.

या दुसऱया सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 215 धावा जमवित विंडीजला विजयासाठी 216 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 9 बाद 125 धावा जमविल्या. त्यांना हा सामना 90 धावांनी गमवावा लागला.

न्यूझीलंडच्या डावामध्ये ग्लेन फिलीप्सने 41 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांसह 76 धावा झोडपल्या. मिचेलने 20 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 48 तर कॉन्वेने 34 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 42, ग्युप्टीलने 11 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. ग्युप्टील आणि कॉन्वे या सलामीच्या जोडीने 31 धावांची भागीदारी केली.

कॉन्वे आणि फिलीप्स यांनी दुसऱया गडय़ासाठी 71 धावांची भर घातली. कॉन्वे बाद झाल्यानंतर फिलीप्स आणि मिचेल यांनी चौथ्या गडय़ासाठी 83 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडच्या डावामध्ये 13 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे मॅकॉयने 40 धावांत 3 तर शेफर्ड आणि स्मिथ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात सहा फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मॅकॉयने 15 चेंडूत एक षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 23 तर वॉल्सने 8 चेंडूत एक षटकारासह 10, शेफर्डने 18 चेंडूत एक षटकारासह 18, पॉवेलने 18 चेंडूत एक षटकार आणि 2 चौकारासह 21, होल्डरने एक षटकारासह 13 आणि हेतमेयरने एक षटकार आणि एक चौकारासह 14 धावा जमविल्या.

विंडीजच्या डावात सात षटकार आणि आठ चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे सँटेनर आणि ब्रेसवेल यांनी प्रत्येकी तीन तर साऊदी-सोधी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता.

संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड 20 षटकात 5 बाद 215 (फिलीप्स 76 , मिचेल 48, कॉन्वे 42, ग्युप्टील 20, मॅकॉय 3-40, शेफर्ड 1-25, स्मिथ 1-30), विंडीज – 20 षटकात 9 बाद 125 (मॅकॉय नाबाद 23, वॉल्श नाबाद 10, शेफर्ड 18, पॉवेल 21, होल्डर 11, हेटमेयर 14, सँटेनर 3-15, ब्रेसवेल 3-15, साऊदी 1-34, सोधी 1-36).

Related Stories

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका पाच सामन्यांची हवी : वॉर्न

Patil_p

भारताचा यजमान जॉर्डनवर निसटता विजय

Patil_p

ऍस्टोन व्हिलाकडून लिव्हरपूल एकतर्फी धुव्वा

Patil_p

हनुमा विहारीऐवजी जडेजाला संधी शक्य

Patil_p

सीएसके, केकेआर 10 नेट गोलंदाज नेणार

Patil_p

मिताली राज सातव्या तर स्मृती मानधना नवव्या स्थानी

Patil_p
error: Content is protected !!