प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहरात आज सकाळी नवजात अर्भक स्त्री अर्भक दवाखान्यात समोरील एका आंब्याच्या झाडाखाली ठेवण्यात आले होते. याबाबत येथील इस्पितळात येऊन अज्ञाताने तेथील कर्मचाऱ्यांना माहिती दिली कामावर रुजू असलेल्या ज्योती नामक परिचारिकेने अर्भक दवाखान्यात नेऊन ठेवले व सदरची माहिती खानापूर बालसंगोपन केंद्र तसेच बेळगाव जिल्हा बालसंगोपन केंद्र व पोलिस ठाण्यात देण्यात आली त्यानंतर नियमानुसार सदर अर्भक बाल संगोपन खात्याच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर या बालिकेची रवानगी बेळगाव जिल्हा रुग्णालयात करण्यात आली.