Tarun Bharat

बांगलादेशच्या कसोटी संघात नवोदित झकीर हसनला संधी

वृत्तसंस्था /चेतोग्राम

यजमान बांगलादेश आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीला येथे 14 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बांगलादेश संघातील नियमित फलंदाज तमिम इक्बाल अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याच्या जागी नवोदित झकीर हसनला संधी देण्यात आली आहे.

तमिम इक्बालला यापूर्वी स्नायू दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नाही. नवोदित झकीर हसनने भारत अ संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात दर्जेदार फलंदाजी करत सामनावीराचा बहुमान मिळविला. बांगलादेशच्या निवड समितीने झकीर हसनला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरी कसोटी 22 डिसेंबरपासून मिरपूर येथे होणार आहे.

Related Stories

न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉनमध्ये केनियाची जेपचिरचिर विजेती

Patil_p

हॅलेप, नदाल, किर्गीओस, गॅरिन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

रेड बुलचा व्हर्स्टापेन विजेता

Patil_p

एमपीएल स्पोर्टस् भारतीय संघाचे नवे किट प्रायोजक

Patil_p

माजी टेबल टेनिसपटू सुहास कुलकर्णीचे निधन

Patil_p

कमिन्स, वॉर्नर, हॅजलवूड, मॅक्सवेल पाक दौऱयातून बाहेर

Patil_p