Newly appointed Lieutenant Dipali Gawkar was felicitated
इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग, डिस्ट्रिक्ट सेंटर, सिंधुदुर्ग व सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्य दलातील नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा सत्कार करण्यात आला. सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग शाखा कोलगांव येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन सुभेदार मेजर शिवराम जोशी व आय. ई. एस. एल. चे जिल्हा अध्यक्ष सुभेदार शशिकांत गावडे यांच्या हस्ते गावकर व त्यांचे वडील विजय गावकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक बाबुराव कविटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, भारतीय भूतपूर्व माजी सैनिक संघटनेचे जनरल सेक्रेटरी हवालदार दीपक राऊळ, कुडाळ तालुकाध्यक्ष कॅप्टन विक्टर पिंटो, सैनिक स्कूल आंबोलीचे प्रशिक्षक सुभेदार शिवराज पवार, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, समन्वयक एस. एम. चंद्रशेखर जोशी, सुभेदार सुभाष कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे, कुडाळ शाखाव्यवस्थापक सुहास सावंत, कोलगांव शाखाव्यवस्थापक सौ. संगीता सावंत, आदींसह अनेक माजी सैनिक व सैनिक नागरी पतसंस्था कर्मचारी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी