Tarun Bharat

दिल्लीच्या नव्या नायब राज्यपालपदासाठी 4 नावांची चर्चा

Advertisements

ऑनलाईन टिम / नवी दिल्ली

दिल्लीचे (New Delhi) नायब राज्यपाल (LG) अनिल बैजल (Anil Baijal) यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) यांच्याकडे राजीनामा पाठवला. जरी राजीनामा पोहोचला असला तरी राष्ट्रपती जमैका, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या दौऱ्यावर असल्याने तो अद्याप स्वीकारला गेला नाही. राष्ट्रपती 21 मे पर्यंत परदेश दौऱ्यावर आहेत.

आपल्या राजीनाम्यात ‘वैयक्तिक कारणास्तव’ असा उल्लेख करून अनिल बैजल यांनी आपला राजीनामा पाठवल्याचे कळत आहे. 31 डिसेंबर 2016 रोजी दिल्लीचे नायब राज्यपाल बनले. माजी नोकरशहा असलेले अनिल बैजल यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ गेल्याच वर्षी संपला होता, परंतु राष्ट्रपतीकडून त्यांना मुदतवाढ देण्यात आली.

दरम्यान, माजी केंद्रीय गृहसचिव असलेले अनिल बैजल यांचा राजीनामा औपचारिकपणे स्वीकारल्यानंतर, त्यांच्या जागी चार नावे चर्चेत असून, त्यापैकी एक नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

प्रफुल्ल खोडा पटेल ( Prafull Khoda Patel ) यांचं नाव चर्चेत असून सध्या ते लक्षद्वीपचे प्रशासक आहेत. लक्षद्वीप हे दिल्लीप्रमाणेच एक केंद्रशासित प्रदेश असून गेल्या वर्षी स्थानिक लोकांच्या ‘परंपरा आणि संस्कृतीवर परिणाम करणारे निर्णय’ घेण्यासाठी चर्चेत होते.

राजीव महर्षी ( Rajiv Maharshi) यांचंसुध्दा नाव यामध्ये आघाडीवर असून ते बैजल यांच्याप्रमाणेच, माजी केंद्रीय गृह सचिव होते. याचबरोबर त्यांनी वित्त सचिव आणि नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) म्हणूनही कार्य केले आहे.

तीन नंबरला सुनील अरोरा (Sunil Arora) यांचं नाव असून ते माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संपला आहे. याचबरोबर अरोरा यांनी अनुक्रमे कौशल्य विकास, उद्योजकता तसेच माहिती आणि प्रसारण मंत्र्यालयामध्ये सचिव म्हणून काम केले आहे.

राकेश अस्थाना हे सुद्धा या शर्यतीत असून ते दिल्लीचे विद्यमान पोलीस आयुक्त आहेत. राकेश अस्थाना यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रीय राजधानीत आपला कार्यकाळ सुरू केला. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अस्थाना यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.

Related Stories

घंटागाड्यांच्या डिझेलसाठी लाखोंची उधळपट्टी

Sumit Tambekar

वकीलांना श्रेय न दिल्यास 15 जानेवारीनंतर ‘छपाक’ बंद

prashant_c

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान परतलं

Abhijeet Shinde

सिंघु बॉर्डरवर तैनात दोन पोलीस ऑफिसर कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

पंतप्रधान मोदींशी पंजाब मुख्यमंत्र्यांची चर्चा

Patil_p

तौत्के चक्रीवादळ : मुंबई परिसराला ऑरेंज ॲलर्ट, तर रायगडला रेड ॲलर्ट

Rohan_P
error: Content is protected !!