Tarun Bharat

डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच आज दलितांमध्ये आत्मविश्वास, लवकरच इंदूमिल स्मारक पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

dr.babasahebambedkar- भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबईच्या चैत्यभूमीवर आज जनसागर उसळला आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली.

‘इंदू मिल स्मारकाबाबत बोलताना,इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही आढावा घेत पाहणी केली आहे. बाबासाहेब यांचा आठवणी जपण्याचा काम केलं जाईल. राजगृहवरील ऐतिहासिक ठेवा सुद्धा जपला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इंदू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल.अशी ग्वाही दिली.’

‘माझ्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबातील नागरिक आज मुख्यमंत्री झाला हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडलं. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावना बाबासाहेबांननी काढून टाकली. दलित बांधवांमध्ये जो आत्मविशास निर्माण झाला, त्याचं श्रेय डॉ. आंबडेकरांना जातं.’ असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Stories

अशरफ घनी यांचा भाऊ तालिबानमध्ये सामील

datta jadhav

बिल गेट्स-मेलिंडा घेणार घटस्फोट

datta jadhav

प्रकाश आंबेडकरांचं युतीबाबत मोठं वक्तव्य; उद्धव ठाकरे प्रस्ताव स्वीकारणार का?

Archana Banage

Sangli; एक हजारांची लाच स्विकरताना आरोग्य अधिकारी लाचलुचतच्या जाळ्यात

Abhijeet Khandekar

चाकरमानी थांबेनात, प्रशासन हतबल

NIKHIL_N

दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर

Archana Banage