Tarun Bharat

satara; कोयनेच्या काठावर भूकंपाचे सौम्य धक्के, व्यवस्थापनाकडून दुजोरा

Advertisements


koyanaearthquak- कोयना परिसराला भूकंपाच सौम्य धक्का बसलाय… आज दुपारी एक वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात कोणतेही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका झालेला नाही. सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची चर्चा होती. दरम्यान, कोयना धरण व्यवस्थापनाकडून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

व्यवस्थापनाने दिलेली माहिती अशी कि, शुक्रवार दिनांक २२ जुलै रोजी दुपारी १ वाजता कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हदराला असून, या भूकंपाची महत्ता ३ रिष्टर स्केल इतकी होती, हा भूकंप संपूर्ण कोयना परिसरात जाणवला आहे. या भूकंपाची खोली ९ किलोमीटर इतकी होती. तर या भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यातील हेळवाक गावाच्या नैरूत्तेस ७ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपा पासून कोयना धरणास कोणता धोका नसून या भूकंपाने परिसरात प्रथम दर्शनी कोणतीही वित्त वा जीवित हानी झाली नसल्याचे कोयना व्यवस्थापन विभागाच्या उपकरण उपविभागाकडून कळविण्यात आले आहे.

Related Stories

ताशी 120 किमीने धडकणार निसर्ग वादळ

datta jadhav

पारा चढला; सातारकर घामाघुम

Patil_p

पोलीस नाईक रेहाना शेख यांनी मुलीच्या वाढदिवशी दत्तक घेतले 50 विद्यार्थी!

Archana Banage

लडाख सीमेवरून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे हटले

datta jadhav

आता विद्यापीठात निवडणूक प्रक्रियेवर अभ्यासक्रम

Abhijeet Khandekar

बाधितांच्या संख्येत चढ-उतार

datta jadhav
error: Content is protected !!