ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
चीनच्या कोणत्याही आक्रमणापासून तैवानचे संरक्षण करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या विधानाला चीनने फटकारले आहे. सोमवारी बीजिंगने आपल्या तैवानसंबंधी आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यास तयार असल्याचेही सांगितले आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केले की त्यांनी स्वशासित तैवान कधीही आपल्या नियंत्रणात आणले नाही. परंतू ते बेटाला आपल्या प्रदेशाचा भाग मानतात आणि गरज पडल्यास ते ताब्यात घेऊ शकतो असे सांगितले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन प्रादेशिक मित्रपक्षांना भेटण्यासाठी टोकियोमध्ये आहेत. बायडन यांनी सोमवारी चेतावणी दिली की तैवानवर चीनची वाढती भूमिका धोक्याने संकेत आहेत आणि त्यांनी तैवानला त्याच्या ताकदवान शेजाऱ्याकडून कोणत्याही लष्करी कारवाईपासून वाचवण्याचे आश्वासन दिले.
बायडन यांच्या विधानाचा बीजिंगकडून निषेध करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी पत्रकारांना सांगितले की “तैवान हा चीनच्या भूभागाचा अविभाज्य भाग असून तैवानचा मुद्दा हा चीनचा पूर्णपणे अंतर्गत मामला आहे. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या चीनच्या हितसंबंधांना स्पर्श करणाऱ्या मुद्द्यांवर, चीन कधीच तडजोड करू शकत नाही.”