ऑनलाईन टिम / आग्रा
मथुराचे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) गुरुवारी श्री कृष्ण जन्मभूमीसंदर्भात सुणावणी करणार आहेत. या मंदीराला लागून असलेली शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी करणाऱ्या सप्टेंबर 2020 ची ही याचिका आहे.
मथुरेच्या जिल्हा न्यायाधीशांनी 2020 मध्ये स्वीकारार्हतेच्या कारणास्तव याचिका फेटाळण्यात आली होती.
त्यानंतर 19 मे रोजी जिल्हा न्यायाधीशांनी याला पुन्हा परवानगी देण्यात आली. याबरोबर असेही स्पष्ट केले की हा दावा कायम ठेवण्यायोग्य असून याचिकाकर्त्यांना तो दाखल करण्याचा अधिकार आहे.
याचिकाकर्त्यांचे वकील हरी शंकर जैन म्हणाले की, जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशामुळे सत्य बाहेर येण्यास मदत होईल. “जिल्हा न्यायाधीश कोर्टाने मांडलेले मत अगदी बरोबर होते, 1968 साली केलेल्या तडजोडीला याचिकाकर्त्यांद्वारे आव्हान दिले जात आहे आणि त्यामुळे या प्रकरणात पूजास्थळे कायदा (विशेष तरतुदी) अधिनियम 1991 च्या तरतुदी लागू होत नाहीत. असे 1947 नंतर प्रथमच घडले आहे.”
जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला शाही ईदगाह मशिदीची व्यवस्थापन समिती आव्हान देणयाची शक्यता व्यक्त केली जाते.