Tarun Bharat

वृत्तपत्र विक्रेता दिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा करणार

प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी /बेळगाव

महाराष्ट्रातील वर्धा येथे देशाच्या विविध राज्यातील वृत्तपत्र विपेता संघांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. महाराष्ट्र व वर्धा वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सुनिल पाटणकर व महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष बालाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेवाग्राम येथे ही बैठक झाली. बैठकीमध्ये बेळगाव जिल्हय़ातील प्रतिनिधींनीही सहभाग घेऊन बेळगावचे नेतृत्त्व केले.

मजदूर नेता व भारतीय जनता वर्कर फेडरेशनचे प्रदेश महासचिव मिलिंद देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आवश्यक मदत करण्याबरोबर 15 ऑक्टोबर रोजी भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा विषय केंद्रीय मंत्रिमंडळात मांडण्याचे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले. बैठकीत राष्ट्रीय संघटना स्थापन करण्याबाबत ठराव मांडण्यात आला.

बैठकीत केरळ, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र येथील संघांचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय संघटनेच्या पुढील कार्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली. यासाठी कर्नाटकातून जय्यप्पा बंकर (हावेरी) व प्रताप भोसले (बेळगाव) यांची निवड करण्यात आली. बेळगावमधून दीपक राजगोळकर व नामदेव कळ्ळीगुडी उपस्थित होते.

Related Stories

अतिवाड चार दिवसांपासून अंधारात

Amit Kulkarni

हात जोडतो, आम्हाला गावी जाऊ द्या…

Patil_p

पंढरपूरसह महाराष्ट्रातून बेळगावला गांजा पुरवठा

Amit Kulkarni

एमएसडीएफ संघाकडे फुटसाल चषक

Amit Kulkarni

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडून कुडची मुख्याधिकाऱयांची प्रशंसा

Patil_p

गोकाक, अरभांवी मतदार संघामध्ये भाजपचे शक्ती प्रदर्शन

Patil_p