ऑनलाईन टीम/तरुण भारत
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim ) आणि साथीदारांविरुद्ध एनआयएकडून (NAI) आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. डी गॅंगने उकळलेल्या खंडणीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केल्याचं समोर आलं होतं. यानंतर दाऊद इब्राहिमसह त्याच्या ४ साथीदारांविरुद्ध आरोपत्र दाखल करत कारवाई केली आहे. दाऊदकडून मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी खंडणीच्या पैशाचा वापर केला जात आहे, असा एनआयएने आरोप केलाय.
दरम्यान, एनआयएकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि ४ साथीदारांविरुद्धआरोपपत्र दाखल केलं आहे. एनआयने या पूर्वी तिघांना अटक केली असून दाऊदसह आणखी काही जणांना वॉंटेड घोषित करण्यात आलंय. तर श्रीमंत लोकांकडून खंडणी उकळून त्याचा वापर दहशतवादासाठी करण्यात येत होता. अटक करण्यात आलेल्या तिघांना हवालाकडून पैसे मिळत होते. हवालातून मिळालेल्या पैशाचा वापर मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी वापरण्यात येत होता अशी माहिती एनआयएला मिळाली. त्यावरून एनआयएने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, डी गॅंगशी संबंधित खंडणी प्रकरणी सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी हे दोघेही टेरर फंडिंग प्रकरणात अटकेत आहेत. एनआयएकडून दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात या दोघांसह दाऊद आणि छोटा शकीलचा समावेश आहे. सलीम फ्रुट हा छोटा शकीलचा साडू आहे.