Tarun Bharat

जमात-ए-इस्लामी विरोधात एनआयएचे छापे

काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी कारवाई

वृत्तसंस्था /श्रीनगर

राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रतिबंधित संघटना जमात-ए-इस्लामीच्या विरोधात नोंद एका गुन्हय़ाप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने गुरुवारी काश्मीर खोऱयात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. 2019 मध्ये जमात-ए-इस्लामी विरोधात फुटिरवादी कारवायांना बळ देण्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतरही या संघटनेने देशविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.

संघटनेचे सदस्य देश आणि विदेशातून निधी जमवत आहेत. परंतु या पैशांचा वापर कल्याणकारी योजनांऐवजी हिंसक आणि फुटिरवादी कारवायांसाठी केला जात असल्याचे एनआयएने म्हटले आहे. जमातकडून जमविण्यात आलेली रक्कम संघटनेशी निगडित कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांच्या जाळय़ाच्या माध्यमातून हिज्ब-उल-मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा आणि अन्य दहशतवादी संघटनांनाही पाठविण्यात येत आहे. जमात-ए-इस्लामी ही संघटना काश्मीरमधील तरुणांची दिशाभूल करत त्यांना फुटिरवादी कारवायांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करत आहे. कथित जिहादच्या नावावर दहशतवादी संघटनांमध्ये सामील करत आहे.

श्रीनगरमधील चिनार बाग येथील रहिवासी फारुख अहमद भटच्या घरी एनआयएने छापा टाकला आहे. भट हा जमात-ए-इस्लामी बडगामचा जिल्हाध्यक्ष आहे. याचबरोबर बडगाम जिल्हय़ातच काही जणांच्या घरी छापे टाकण्यात आले आहेत. उत्तर काश्मीरच्या चांककूट येथील जमात-ए-इस्लामीच्या दोन सदस्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले.

एनआयएने काश्मीर खोऱयात अनेक ठिकाणी देखील शोधमोहीम हाती घेतली आहे. छाप्यांमध्ये एनआयएने संशयितांच्या घरांमधून आक्षेपार्ह दस्तऐवज हस्तगत केले आहेत. याचबरोबर टीमने अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त केली आहेत. ही कारवाई आणखीन काही काळ सुरू राहण्याची शक्यता आहे.

Related Stories

बंडखोर आमदार तळ ठोकून असलेल्या ‘रेडिसन ब्लू’ने घेतला मोठा निर्णय

datta jadhav

चार कामगार कायदा संहिता लागू करणार

Patil_p

शाळेचे छत कोसळून 27 मुले जखमी

Amit Kulkarni

15 ऑगस्टला ‘या’ ठिकाणी हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

Tousif Mujawar

अपघातानंतर लागलेल्या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू

datta jadhav

22 प्रकारचे मासे अन् भात मोफत खा

Patil_p
error: Content is protected !!