Tarun Bharat

सहा राज्यांमध्ये एनआयएचे छापे

आयएसआयएस मॉडय़ूल टार्गेट ः 13 ठिकाणी कारवाई

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

एनआयएने आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या मॉडय़ूलसंबंधी रविवारी सहा राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकसह उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार आणि मध्यप्रदेशमधील 13 ठिकाणांवर एनआयएने कारवाई केल्याचे सांगण्यात आले. तपास एजन्सीने याबाबत कोणतीही माहिती दिली नसली तरी पथकाला संशयास्पद वस्तू सापडल्याचे समजते.

एनआयएने 25 जून रोजी आयपीसीच्या कलम 153-ए आणि 153-बी आणि युए(पी) कायद्याच्या कलम 18, 18-बी, 38, 39 आणि 40 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात एजन्सीने भोपाळ आणि रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिह्यांमध्ये, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूर शहरे, महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड आणि उत्तर प्रदेशमधील देवबंद जिह्यात छापे टाकले आहेत.

एनआयए आणि एटीएसच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून एका संशयित तरुणाला अटक केली आहे. फारुख असे तरुणाचे नाव आहे. देवबंदमधील एका मदरशात बराच काळ शिकत असलेल्या या तरुणाला अनेक भाषांचे उत्तम ज्ञान आहे. हा तरुण कर्नाटकातील आयएसच्या दहशतवादी मॉडय़ूलच्या संपर्कात होता आणि टेलीग्रामद्वारे अनेक भाषांमध्ये दहशतवादी साहित्याचे भाषांतर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दहशतवाद्याचा सीरियातील बॉम्बस्फोटांशीही संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयएने त्याची पुढील चौकशी सुरू केली आहे.

पाटणा येथील फुलवारी शरीफ दहशतवादी प्रकरणासंदर्भात एनआयएच्या पथकाने गुरुवारी बिहारमधील सहा जिल्हय़ांमध्ये छापे टाकले. पाटणा, दरभंगा, मोतिहारी, नालंदा, अररिया आणि मधुबनीमध्ये एनआयए टीमने पोलिसांसह शोधमोहीम सुरू केली होती. या कारवाईत एनआयएच्या पथकाला विविध ठिकाणांहून डिजिटल उपकरणे आणि अनेक महत्त्वाचे कागदपत्र मिळाले. पाटण्यात पीएफआयचे संरक्षक अतहर यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. एनआयएच्या पथकाने दरभंग्यात तीन ठिकाणी छापे टाकल्याचेही सांगण्यात आले.

Related Stories

शेतकरी आंदोलन मुद्द्यावर राहुल गांधी यांचे ट्विट; म्हणाले …

Tousif Mujawar

झोपेतून जागे व्हा आणि कोरोना समस्यांचा सामना करा – केंद्राला आयएमएने सुनावलं

Archana Banage

अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचे आज आंदोलन

Patil_p

आंतरराष्ट्रीय सीमेवरील घुसखोरीचा प्रयत्न BSF ने रोखला

datta jadhav

भारताच्या नेतृत्वाखाली विकसनशील देशांचा कुंभ

Amit Kulkarni

शिंजो आबेंच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान मोदी जपानला रवाना

Patil_p