ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दिल्लीतील बाटला हाऊसप्रकरणी (delhi batla house) छापा टाकून ISIS च्या सदस्याला अटक केली आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेला हे (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. मोहसीन अहमद असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. जो क्रिप्टोकरन्सीच्या मदतीने दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत होते. एनआयएने रविवारी ६ ठिकाणी छापेमारी करत त्यांना या दहशतवाद्याला अटक करण्यात यश मिळाले आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेला संशयित हा इसिसचा कट्टर आणि सक्रिय सदस्य आहे. मोहसीन अहमद बिहारचा रहिवासी आहे. यावेळी ISISचा ऑनलाइन प्रचार करत होता. काही काळ ते बाटला हाऊसमध्ये राहत होते. तिथून त्याला अटक करण्यात आली आहे. तो भारत आणि परदेशातील ISIS बद्दल सहानुभूती असलेल्या लोकांकडून निधी गोळा करत असे. यासाठी त्याने क्रिप्टोकरन्सीचा वापर केला आहे.
दिल्लीच्या जामिया मिलिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोहसीनबद्दल दिलेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणेने ही कारवाई केली. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीने अनेक विद्यार्थ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तपास यंत्रणेने २५ जून रोजीच मोहसीनविरोधात गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर त्याचा सतत शोध सुरू होता.
हे ही वाचा : IMD : पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा, मच्छिमारांना अलर्ट
आरोपी अफगाणिस्तान आणि सीरियातील आयएसआयएस कमांडरच्या संपर्कात होता आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे त्यांना निधी पाठवत होता, असे तपासात समोर आले आहे. मोहसीन अहमद भारतातून ISIS साठी फंडिंग गोळा करत होता अशी माहिती NIA अधिकाऱ्यांनी दिली आहे. क्रिप्टोकरन्सी आणि हवालाद्वारे केलेल्या व्यवहारांना कोणी निधी दिला हे तपास यंत्रणा आता शोधत आहे. तसेच त्याचा हँडलर कोण आहे आणि तो कुठे बसला आहे? पुढे तो कुठे पैसे पुरवत होता? पैसे कोणाकडे पाठवले जात होते? याचा तपासही तपास यंत्रणांकडून केला जात आहे.