क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
चिंचली येथे रिवरसाईड स्कूल आयोजित रिवरसाईड चषक फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट चमक दाखविलेल्या संघासमवेत आलेले विदेशी फुटबॉल प्रशिक्षक व्हॅलेंटिनो (नायजेरिया) यांचा खास सत्कार करण्यात आला.
चिंचली येथे झालेल्या रिवरसाईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असलेले नायजेरियन फुटबॉल प्रशिक्षक व्हॅलेंटिनो यांचा खास सत्कार करण्यात आला.
व्हॅलेंटिनो यांनी गेली चार-पाच वर्षे फिनिक्स पब्लिक स्कूल व रायबाग चिंचली येथील स्कूलच्या फुटबॉलपटूंना मार्गदर्शनासह प्रशिक्षणही दिले आहे.
जोसेफ परेरा व राहुल मगदुम यांच्या कार्याची दखल घेऊन विधान परिषदेचे माजी सदस्य विवेकराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे शिवलाल कलाल, शिवाप्पा दमनगी, महांतेश गवी, सुनील देसाई, सौम्या, प्रशांत कडोलकर, गजानन हुदली, एकनगौडा, मदनगौडा, बसु व गणेश सर आदी उपस्थित होते. सत्काराबद्दल व्हॅलेंटिनो यांनी सर्वांचे आभार मानून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.