Tarun Bharat

रात्री झोपताना त्वचेची अशी घ्या काळजी; जाणून घ्या टिप्स

Night Skin Care Routine : कोणत्याही कार्यक्रमाला अथवा पार्टीला जाताना तुम्ही मेकअप करता किंवा आॅफिसवर्क करताना लाईट मेकअप करता. दिवसा जशी चेहऱ्याची काळजी घेता तशीच काळजी रात्री घेणे गरजेची आहे. रात्री झोपताना त्वचेचं उत्तम काम सुरु असतं. रात्री निवांतपणा मिळाल्यानंतर सकाळी चेहरा सुंदर दिसतो. यासाठी काही बेसिक टिप्स वापरल्याने तुमचा चेहरा निखळण्यासाठी मदत होते. यासाठी क्लिंजिंग,टोनर,माॅश्चरायझिंग आणि रेटीनाॅल व नियमित वापरा. यामुळे तुमचे पार्लरचे पैसे नक्की वाचतील. चला तर जाणून घेऊया बेसिक स्टेप.

क्लिंजिंग: दिवसभर चेहऱ्यावर धूळ असते ती क्लीन करण्यासाठी तुम्ही संध्याकाळी क्लिंजगचा वापर करा. फेशवाॅश वापरण्यापूर्वी क्लिंझींग करून घ्या.

फेशवाॅश: क्लिझिंग झाल्यानंतर फेशवाॅशने चेहरा क्लिन करून घ्या. तुमच्या चेहरा कोरडा आहे कि तेलकट हे पाहून तुम्ही फेशवाॅशची निवड करा.

टोनर/ रोझ वाॅटर : चेहरा वाॅश झाल्य़ानंतर तुम्ही टोनरचा वापर करा. किंवा गुलाबपाणी देखील वापरू शकता. पण हे वापरत असताना तुम्ही चेहरा ओला असताना वापरा. चेहरा धुतल्यानंतर ६० सेकंदाच्या आत याचा वापर करा.

माॅश्चरायझिंग: गुलाबपाणी किंवा टोनर वापरून झाल्यानंतर तुम्ही चेहऱ्याला चांगले माॅश्चरायझिंग लावा.

रेटीनाॅल वापरा : चेहऱ्याला माॅश्चरायझिंग लावल्यानंतर रेटीनाॅलचा वापर करा.

डेली रूटिंगमध्ये याचा वापर केल्यास तुम्हाला निश्चितच चेहऱ्यावर फरक जाणवेल. चेहऱ्या सोबत कान आणि मानेला देखील याचा वापर करा. तुम्हाला हे सगळं करण शक्य़ नसेल तर बदामाच्या तेलाने चांगले माॅलिश करा. तुमचा चेहरा छान दिसेल.

Related Stories

आता मॅचिंग ब्लाउजची चिंता सोडा! प्रत्येक साडीसोबत मॅच होणारे टॉप्स

Kalyani Amanagi

लेहेंगा चोलीचा असाही वापर

Amit Kulkarni

पावसाळ्यात ड्रेसअप कसा असावा?

Abhijeet Khandekar

ओठ काळे पडलेत? मग हे आहेत सोपे उपाय

Kalyani Amanagi

यार्डेजच्या साडय़ा

Omkar B

‘सुनील टेक्स्टाईल’चा उद्या उद्घाटन सोहळा

Sandeep Gawade
error: Content is protected !!