क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
एमसीसी स्पोर्टस् क्लब आयोजित अल्फा चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात निना संघाने रॉजर संघाचा तीन धावांनी तर युनियन जिमखानाने एमसीसी संघाचा 8 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. ओवेस निंबुवाले, सिद्धांत यादव यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
फिनिक्स मैदानावर आयोजित निना अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात 9 गडी बाद 151 धावा केल्या. त्यात ओवेस निंबुवालेने 43, मदनने 25 तर मिलिंदने 16 धावा केल्या. रॉजर्सतर्फे शुभमने 3 तर रुजलने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर्सने 22 षटकात 8 गडी बाद 147 धावाच केल्या. त्यात शिवकुमारने 72, इनायत व प्रथमेश यांनी प्रत्येकी 20 धावा केल्या. निनातर्फे ओवेसने 2, समर्थ व परशुराम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात एमसीसी संघाने 18 षटकात सर्व गडी बाद 112 धावा केल्या. त्यात मलिकने 40, प्रेमने 16 धावा केल्या. जिमखानातर्फे सिद्धांत, लोहित व स्वयम यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना 14 षटकात 2 गडी बाद 113 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात अथर्वने 40, स्वयम 22 तर सिद्धांतने 20 धावा केल्या.