Tarun Bharat

रस्ते बांधणी कंपनीची 9 कोटींची फसवणूक

पुणे / वार्ताहर :

रस्ते बांधणी करणाऱ्या कंपनीतील प्रकल्प अधिकाऱ्याने नऊ कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी शाम अशोक निकम (रा. शिंगणापूर, अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृजेंद्रकुमार इंद्रदेव सिंह (वय 42, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

वृजेंद्रकुमार सिंह यांची ‘रोडवे सोल्यूशन इंडिया इन्फ्रा’ कंपनी आहे. या कंपनीकडून खेड-सिन्नर, म्हसवड-पिलिव्ह, कुर्डूवाडी-पंढरपूर, सातारा-रहिमतपूर या मार्गाचे काम करण्यात आले. 2016 ते 2021 या कालवधीत निकम कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत होता. निकम याने डिझेल, खडी, डांबर तसेच अन्य साहित्याचा अपहार करुन कंपनीची 9 कोटी 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे सिंह यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

अधिक वाचा : आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला विरोध; हिंदू महासंघाची न्यायालयात धाव

Related Stories

…त्याआधी राजकारणातील अलका कुबल यांनी हा व्हिडिओ बघावा

datta jadhav

कागलमध्ये तरुणाचा खून

Archana Banage

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची हजारो इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशनसाठी योजना जाहीर

Archana Banage

वाभाडे काढण्यासाठी ‘शॅडो कॅबिनेट’ ची स्थापना : राज ठाकरे

tarunbharat

राज्यात उद्यापासून `अनलॉक’

Archana Banage

UP Election : …. तर आप देणार २४ तासांत ३०० युनिट मोफत वीज

Archana Banage