Tarun Bharat

नीरव मोदीच्या हाँगकाँगमधील २५३ कोटींच्या संपत्तीवर टाच

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या विरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने नीरव मोदी (Nirav Modi) याच्याशी संबंधित कंपनी, हिरे, दागिने, बँक ठेवी यांच्यासह एकूण २५३. ६२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

रम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ED) नीरव मोदी समूह कंपन्यांच्या २५३ कोटी ६२ लाख रुपये किमतीची हाँगकाँगमधील मालमत्ता जप्त केली. त्यात रत्ने, दागिने आणि बँक ठेवींचा समावेश असल्याची माहिती ईडीने शुक्रवारी दिली. या प्रकरणातील एकूण जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत २ हजार ६५० कोटी ७ लाख रुपये आहे.

ईडीने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे, की नीरव मोदीच्या जप्त केलेल्या सर्व मालमत्ता ह्या हॉंगकॉंग मधील आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील चौकशीचा एक भाग म्हणून या सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आहेत. नीरव मोदीच्या(NIRAV MODI) हॉंगकॉंग मधील एका खासगी तिजोरीमध्ये हिऱ्यांचे दागिने आणि तिथलया बँक खात्यांमधील रोख रक्कम ठेवण्यात आली होती. ती सुद्धा जप्त करण्यात आली आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार नीरव मोदीच्या मालमत्तेची तात्पुरती जप्ती करण्यात आली आहे. सध्या नीरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात आहे. त्याच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील नीरव मोदी मुख्य आरोपी आहे.

Related Stories

बेरोजगारी, गरिबीतून तीन युवकांची आत्महत्या

Patil_p

आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर; पण…

Tousif Mujawar

महाराष्ट्र : 3,431 नवीन कोरोनाबाधित; 71 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस 2 जुलै पासून धावणार

Archana Banage

राफेल मुद्द्यावरून राहुल गांधी यांची मोदी सरकारवर पुन्हा टीका; म्हणाले…

Tousif Mujawar

अर्थमंत्र्यांनी बोलावली ‘एफएसडीसी’ची बैठक

Patil_p