Tarun Bharat

मलकापूर शहरात कॉलेजच्या हुल्लडबाज तरुणांवर निर्भया पथकाकडून कारवाई

Advertisements

शाहूवाडी/प्रतिनिधी

सिने स्टाईलने दुचाकीवरून सवारी करत मलकापूर शहरातील विविध चौकाबरोबरच कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

मलकापूर शहरातील निर्जन ठिकाणा बरोबरच चौका चौकातही आणि कॉलेज परिसरात कॉलेज भरताना आणि कॉलेज सुटतेवेळी दुचाकी सवारी करत अनेक हुल्लडबाज तरुण धुमाकूळ घालत आहेत. या पार्श्वभूमीवर निर्भया पथकाने अशा हुल्लडबाज तरुणांच्यावर कारवाईचा बडगा उगारून त्यांना चांगलाच पोलिसी खात्या दाखवला आहे. यापुढेही अशाच हुल्लडबाज तरुणांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता चांगलीच मोहीम हाती घेतली आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने आता विशेष लक्ष देऊन कॉलेज भरतेवेळी व कॉलेज सुटतेवेळी कॉलेज परिसरात मलकापूर शहरातील मंदिर चौक या ठिकाणीही भेट देऊन अशा तरुणांबरोबरच युवतींनाही समज देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून पुढे येऊ लागली आहे.

निर्भया पथकात महिला पोलीस कॉन्स्टेबल आमटे, पोलीस कॉन्स्टेबल कानुगडे, सुयश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल बादरे,  पोलीस कॉन्स्टेबल पाटील, होम गार्ड व्हटाळे, पाटील, केसरे, काळे आदीच्या पथकाने सहभाग घेतला.

Related Stories

महापुराबाबत महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये समन्वय

Archana Banage

मराठा आरक्षणासाठी शरद पवार पुढाकार घेणार असतील तर आम्ही पाठीशी : चंद्रकांत पाटील

Archana Banage

दहा महिन्यांनी वाजणार शाळेची घंटा

Archana Banage

मलकापूर परिक्षेत्रातील मोटर अपघात प्रकरणी गुन्ह्याचा 24 तासात निकाल

Archana Banage

धामोडपैकी नऊनंबर येथे जनावरांवर पहिल्यादांच ‘लंपी ‘ रोगाचे आक्रमण

Archana Banage

श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांना जगू देणार नाहीत

Archana Banage
error: Content is protected !!