Tarun Bharat

पुण्यात निर्मला सीतारामन यांच्या प्रतिमेला काळे फासले

Advertisements

पुणे / प्रतिनिधी :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवरील प्रतिमेला काळे फासण्यात आल्याची घटना रात्री उशिरा पुण्यातील धनकवडी परिसरात घडली.

बारामती मतदारसंघातील खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी व भाजपचा गड अधिक मजबूत करण्यासाठी सीतारामन पुणे दौऱ्यावर आहेत. धनकवडी भागात शिवछत्रपती सभागृह येथे निर्मला सीतारामन यांच्या स्वागतासाठी कमान उभारण्यात आली होती. या कमानीवर त्यांचा फोटो लावण्यात आला होता. त्याचसोबत खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार भीमराव तापकीर यांचाही या कमानीवर फोटो होता. याच बोर्डावरच्या सीतारामन यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. रात्री उशिरा हा प्रकार घडला. मात्र, हा प्रकार कोणी केला, याबद्दल कोणतीही माहिती हाती आलेली नाही. याप्रकरणी अद्याप पोलिसांतही तक्रार देण्यात आलेली नाही. यापूर्वी पुण्यातच आपच्या कार्यकर्त्यांकडून निर्मला सीतारामन यांच्या गाडय़ांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला होता.

अधिक वाचा : गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही

Related Stories

‘ज्ञानवापी’चं लोण आता पुण्यात

datta jadhav

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे : डॉ.के.व्यंकटेशम

Tousif Mujawar

मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर रोहित पवारांनी केली खास पोस्ट, म्हणाले…

Archana Banage

Krishna-Marathwada Irrigation Scheme : कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेला ११७३६ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प मंजूर

Abhijeet Khandekar

किरीट सोमय्यांचा पुन्हा कोल्हापूरला येण्याचा मुहूर्त ठरला

Archana Banage

नवीन अभ्यासक्रमात शिवराय, फुले व सावरकरांच्या चरित्राचा समावेश

datta jadhav
error: Content is protected !!