Tarun Bharat

नितीन गडकरी म्हणजे Man Of Commitment- धनंजय महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी

मी राष्ट्रवादीमध्ये असताना नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांना खूप भीत होतो. मात्र गडकरी यांनी काहीही न विचारता लगेच बास्केट ब्रीजला ( Bascket Bridge ) मंजुरी दिली. त्यामुळेच नितीन गडकरी हे Man Of Commitment आहेत अशा शब्दात खासदार महाडिक यांनी केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांचा गौरव केला. या ब्रीजमुळे कोल्हापुरात खूप राजकारण झाले याची खिल्ली उडवण्यात आली. सध्या कोल्हापुरात खूप खालच्या पातळीच राजकारण सुरू असल्याची खंत भाजपचे (BJP) खासदार धनंजय महाडिक ( MP Dhananjay Mahadik ) यांनी व्यक्त केली.
मध्यमांशी बोलताना खाससदार माहडिक म्हणाले, “मी 2 वेळा पराभूत झालो. मात्र २०१४ आणि २०१९ ला कोल्हापूरात बास्केट ब्रीजची संकल्पना प्रथम आणली. मात्र, माझ्य़ा पराभवानंतर बास्केट ब्रीजची खिल्ली उडवली गेली. १२ ते १३ वर्ष विरोधकांकडे सत्ता असून ही त्यांनी कोणताही विकास केला नाही. केवळ स्वतःचा विकास केला. सर्व सत्ता आपल्याकडेच पाहिजे अशी विरोधकांची इच्छा होती.” अशी टीका महाडिक यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “बास्केट ब्रीजमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आम्हाला कोल्हापूरात येणाऱ्या पुरातून वाचवा असे आवाहन मी गडकरींना केलं होतं. तसेच अंबाबाईच मंदिर असल्याने लाखो भाविक कोल्हापुरात येतात यामुळे ट्रॅफिकची समस्या वाढत आहे. यामुळे कोल्हापूर शहरातही फ्लाय ओव्हर करून द्यावा अशी मागणीही त्यांच्याकडे केली होती.” असे खासदार महाडीक यांनी माहीती दिली.
कोल्हापुर महानगर पालिकेसाठी 75 इलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात तसेच कोल्हापुरातील सर्व किल्ल्यांनवर रोपवे करून देण्यासाठी महाडिकांनी गडकरींना साकडे घातले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

उर्फीनं नीट कपडे घालून महिला आयोगात जावं-चित्रा वाघ

Archana Banage

आता नव्या नावावरही दोन्ही गटाचा दावा, पेच निर्माण होण्याची शक्यता

datta jadhav

दुकानदारांनी मास्कचा वापर न केल्यास दुकानावर कारवाई : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Archana Banage

पुण्यात सव्वादोन कोटींचे कोकेन जप्त; नायजेरियन तरुण अटकेत

datta jadhav

विटा शहरातील राष्ट्रीय महामार्गांचे रखडलेले काम त्वरीत पुर्ण करा

Archana Banage

माढा : बाधिताच्या संपर्कातील ४६ जणांचे स्वॅब पाठवले तपासणीला

Archana Banage