Tarun Bharat

नितीशकुमार, लालू यादव आज सोनियांना भेटणार

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार रविवारी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. लालूंनी शनिवारी भाजपवर जोरदार टीका करतानाच विरोधकांना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे स्पष्ट केले. नवी दिल्लीत दाखल झालेल्या लालू यादव यांना 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवणार का? अशी विचारणा केली असता त्यांनी, “होय, आम्ही त्यांना उखडून टाकू. मला हे किती वेळा सांगावे लागेल?’’ असे ते म्हणाले. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनीही बिहारमधील भाजप आमदार-खासदारांची बैठक घेतली. यादरम्यान, ‘बिहारचा मुख्यमंत्री कोण?’ या प्रश्नावर त्यांनी सध्या पक्षाची नजर 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीकडे असल्याचे सांगितले.

2024 साठी विरोधी गट मजबूत करणार

लालूप्रसाद यादव यांचा भाजपवर निशाणा

विरोधकांच्या एकजुटीसाठी सोनियांची भेट

Related Stories

अखेर तिन्ही कृषी कायदे रद्द

Patil_p

शेतकऱयांचा शेतात मृत्यू झाल्यास 5 लाखांची मदत

prashant_c

…तर मी हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो; राहुल गांधींची खोचक टीका

Archana Banage

तिहार तुरुंगात दोन गटात सशस्त्र राडा, 15 कैदी जखमी

datta jadhav

‘पीएम केअर फंड’च्या वापरासंबंधी याचिका

Patil_p

उत्तरप्रदेशातील ‘राजकारणा’त दरवळणार सुगंध

Patil_p
error: Content is protected !!