पाटणा / वृत्तसंस्था
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांची सोमवारी येथे भेट घेतली आहे. लवकरच नितीश कुमार दिल्लीत येत आहेत. त्यांच्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱयात ते विविध विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करुन भाजप आणि रालोआविरोधात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ते काँगेस नेत्या सोनिया गांधी यांनाही भेटणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोनिया गांधी परदेशी गेल्या असून त्या परत आल्यानंतर ही भेट होणार आहे.