गारगोटी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काल शनिवारी खानापूर येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत यांच्या घरी भेट दिली, व त्यांच्या घरात प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीचे दर्शन घेतले,यावेळी त्यांनी विधिवत पूजा केली व सामूहिक आरती केली.यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रविणसिंह सावंत यांनी सावंत परिवाराचे वतीने स्वागत केले.
यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे लखमराजे सावंत भोसले, भाजपा भुदरगड तालुकाध्यक्ष विनायक परुळेकर, खानापूरच्या माजी सरपंच सौ विद्या सावंत, भाजपा विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पार्थ प्रविणसिंह सावंत आदी उपस्थित होते.
नामदार पाटील यांनी माजी आमदार बजरंग देसाई यांच्या घरी व मंडळास भेट दिली तर अल्केश कांदळकर यांच्या सन्मित्र मंडळास भेट देवून गणेशाची आरती केली यावेळी संघटनमंत्री नाथाजी पाटील, जयवंत चोरगे, आदी प्रमुख उपस्थित होते.