15 पैकी 8 नगरसेवकांच्या नोटीसीवर स्वाक्षऱ्या
प्रतिनिधी / फोंडा
फोडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश रवी नाईक यांच्याविऊद्ध अविश्वास नोटीस जारी करण्यात आली असून 15 पैकी 8 नगरसेवकांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत. रितेश नाईक हे भाजपा समर्थक व कृषीमंत्री रवी नाईक यांचे पुत्र आहेत. अवघ्या सात महिन्यात त्यांच्याविऊद्ध अविश्वास दाखल केल्याने फोंडा पालिकेवर पुन्हा राजकीय सत्तानाट्या सुऊ झाले आहे.
नगरसेवक व्यंकटेश उर्फ दादा नाईक, प्रदीप नाईक, विलीयम आगियार, शांताराम कोलवेकर, गिताली तळावलीकर, जया सावंत, अमिना नाईक व सिमा फर्नांडिस या आठजणांच्या अविश्वास नोटीसीवर स्वाक्षऱ्या आहेत. गुऊवारी सकाळी पालिका संचालकांना नोटीसीची प्रत सादर करण्यात आली. अविश्वास दाखल करणारे नगरसेवक मगो, काँग्रेस व अन्य पक्षांचे समर्थक आहेत. गेल्या 13 एप्रिल रोजी रितेश नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती व अवघ्या सात महिन्यांत त्यांच्यावर अविश्वास दाखल करण्यात आल्याने फोंडा पालिकेवर पुन्हा सत्ता पालटाचे नाट्या सुऊ झाले आहे. रितेश नाईक यांच्या कारकिर्दित हल्लीच घेतलेला घरपट्टी व व्यावसायिक घरपट्ठी वाढीचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. विरोधकांनी तसेच शहरातील व्यावसायिकांनी त्याविरोधात आवाज उठविला होता. पाच पट वाढविण्यात आलेला हा कर त्वरीत मागे घेण्यात यावा यासाठी गेल्या आठवड्यात व्यापारी संघटनेने पालिकेसमोर निदर्शन केले होती. तसेच विविध स्तरातून या निर्णयाला विरोध होत असून विरोधकांनी या मुद्द्यावऊन रितेश नाईक यांना टिकेचे लक्ष्य बनविले आहे. फोंडा पालिकेचा कार्यकाळ येत्या एप्रिलमध्ये संपुष्टात येत असल्याने मे महिन्यात किंवा त्यापूर्वी निवडणुका होण्याची शक्यता आहे. रितेश नाईक यांच्यावरील अविश्वास ठराव संमत झाल्यास फोंडा पालिकेला लवकरच सातवा नगराध्यक्ष लाभणार आहे.