4 वि. 1 मतांनी झाला ठराव संमत.
डिचोली/प्रतिनिधी
मये मतदारसंघातील शिरगाव या पंचायतीचे सरपंच भगवंत गावकर यांच्या विरोधात या पंचायतीच्या तीन पंचसदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव चार विरूद्ध एक मतांनी संमत झाला. पाच पैकी चार पंचसदस्य अविश्वास ठरावाच्या बाजूने राहिल्याने सदर अविश्वास ठराव एकतर्फी संमत झाला.
शिरगावचे सरपंच भगवंत गावकर यांच्या विरोधात पंचसदस्य तथा माजी सरपंच अच्य?त गावकर, सदानंद गावकर व कल्पता घाडी यांनी अविश्वास ठराव आणला होता. काल बुध. दि. 15 जुन रोजी सकाळी या ठरावावर चर्चेसाठी पंचायत कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली.
या बैठकीस सरपंच भगवंत गावकर, उपसरपंचा विजया मांदेकर, पंचसदस्य अच्य?त गावकर सदानंद गावकर व कल्पता घाडी यांची उपस्थिती होती. तसेच गटविकास अधिकारी कार्यालयातून विस्तारित अधिकारी म्हणून प्रतापराव राणे, कनि÷ अभियंता साहिल वेरेकर, पंचायतीचे सचिव स्वप्नज देसाई हेही उपस्थित होते.
सचिव स्वप्नज देसाई यांनी अविश्वास ठरावाची सविस्तर माहिती दिली. या ठरावावरील चर्चेत सरपंच भगवंत गावकर यांच्या विरोधात इतर चारही पंचसदस्यांनी मतदान केल्याने सदर ठराव चार विरूद्ध एक असा संमत झाला.