उच्च न्यायालयाने दिले जिल्हा न्यायालयांना आदेश
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे. न्यायालयाला दि. 24 व 26 ऑक्टोबर रोजी सुटी आहे. 25 रोजी न्यायालयाला सुटी नाही. मात्र सलग सुटी असल्यामुळे वकील न्यायालयात उपस्थित राहणे अशक्मय आहे. त्यामुळे न्यायालयात वकील उपस्थित नाहीत म्हणून कोणत्याही प्रकारच्या खटल्याचा निकाल किंवा कोणालाही वॉरंट काढू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयांना दिला आहे.
दिवाळी सण हा मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. न्यायालयाला सलग सुटी आहे. केवळ एकच दिवस न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे वकील किंवा पक्षकार यांना येणे अशक्मय आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ऍडव्हर्स ऑर्डर काढू नये, असे या आदेशामध्ये म्हटले आहे.