शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचा अहवाल : कोरोनानंतर मोठय़ा उत्साहात साऊंड सिस्टमच्या ठेक्यावर गणेश विसर्जन
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनानंतर तब्बल तीन वर्षांनी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणूक साऊंड सिस्टमच्या दणदणाटात तब्बल 32 तास मिरवणूक सुरू होती. गणेशविसर्जनवेळी साऊंड सिस्टमच्या आवाजाने संपूर्ण शहर दणदणून गेले होते. तसेच पारंपारिक वाद्यांचा कडकडाट आणि लोकांची गर्दी झाली होती. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा ध्वनीप्रदुषणात दुफ्पटीने वाढ झाल्याचे, शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाने केलेल्या ध्वनी मापन सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे.
शहरातील पारंपारिक मार्गाऐवजी पर्यायी मार्गाने इरानी खणीकडे गणेशविसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश विसर्जनावेळी पापाची तिकटी, गंगावेश, राजारामपुरी, उत्तरेश्वर पेठ, उद्यमनगर, यासह अन्य ठिकाणच्या ध्वनीप्रदुषणाचे सर्वेक्षण करण्यात आले. कोरोना कालावधीतील गेल्या तीन वर्षाशी तुलना करता ध्वनीप्रदुषणात सायंकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत दुफ्पटीने वाढ झाल्याचे निदर्शनास येते. यामध्ये साऊंड सिस्टम, फटाके, बाजारपेठा, वर्दळ, लाऊड स्पीकर, वाहनांच्या आवाजाचा समावेश आहे. याबाबतचे सर्वेक्षण शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाने केले आहे. याचा तुलनात्मक अहवाल विभागप्रमुख डाŸ. आसावरी जाधव, डॉ. पी. डी. राऊत, चेतन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षद मालवेकर, मुकुंद सुतार यांनी तयार केला आहे.
प्रदुषणाचा अहवाल
झोन भाग 2021 2022
सायलेंट झोन
सीपीआर 56.06 70.10
कोर्ट 51.03 68.50
जिल्हाधिकारी कार्यालत 55.04 72.00
शिवाजी युनिव्हर्सिटी 39.90 50.60
रेसीडेन्सीयल
शिवाजी पेठ 44.09 70.11
मंगळवार पेठ 46.20 74.90
उत्तरेश्वर पेठ 51.02 76.00
राजारामपुरी 40.1 64.20
नागाळा पार्क 44.23 54.50
ताराबाई पार्क 47.30 66.10
कमर्शियल
लक्ष्मीपुरी 54.08 74.10
बिंदू चौक 55.10 74.90
मिरजकर तिकटी 54.01 80.46
महाव्दार रोड 52.30 82.15
गुजरी कॉर्नर 52.01 79.00
पापाची तिकटी 60.02 85.50
गंगावेश 63.08 82.30
शाहुपुरी 53.02 67.80
राजारामपुरी 52.03 70.00
वाय. पी. पवारनगर 54.60 62.16
उद्यमनगर 56.50 58.40