Tarun Bharat

ध्वनी प्रदूषण कमी झाले, वायू प्रदूषणाचे काय

पायबंद घालणारी यंत्रणाच नाही : यंत्रणा आऊट-सोर्सिगवरच अवलंबून : हृदयासह शरावर घातक परिणाम

संतोष पाटील/कोल्हापूर

दिवाळीत 2018 साली फटाके फोडण्यासाठी दोन तासांचा अवधी न्यायालयाने दिला होता. त्यापूर्वीही आवाज प्रदूषण कायदा 2011 व हवा प्रदूषण कायदा 1981 च्या तरतुदीनुसार फटाके फोडण्यावर मर्यादा होत्या तशा आताही आहेत. यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज व वेळेचे मुल्यमापन करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आऊट सोर्सिंग केले आहे. बंधनं असूनही दिवाळीतील ध्वनीप्रदूषणाची मात्रा यंदा कमी होणार काय? याबाबत उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर महापूर आणि कोरोना महामारीनंतर यंदाची दिवाळी उत्साहात होईल असा अंदाज बांधला जात आहे. महागाईसह प्रबोधनामुळे फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आवाज कमी झाला असला तरी फटाक्यांमुळे हवेतील दुषित घटकांची मात्रा वाढत असून आवाजाचे सोडा हृदयाचे बघा अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शहरातील प्रमुख ठिकाण दिवाळीतील चार दिवस आवाजाची तीव्रता व कालावधी मोजण्यासाठी खासगी संस्थेसह शिवाजी विद्यापीठाला पाचारण करण्यात येते. कोरोना संसर्गापूर्वी मागील वर्षी दोन वर्षाच्या सरासरीत दिवाळीत सरासरी 30 ते 50 डेसिबल (ए) हून अधिक आवाजाची तीव्रता वाढत असल्याची आकडेवारी सांगते. न्यायालयाचे निर्देष व सोशल मीडियातील फटाके विरोधातील प्रचार यामुळे यंदाच्या वर्षी ध्वनिप्रदूषण कमी होण्याची आशा आहे. पर्यावरणपूरक फटाक्यांची बाजारात सध्या चलती आहे. आकर्षक पॅकिंगसह पर्यावरण पुरकतेचा दावा करणाऱया या फटाक्यांची कोणतीही पडताळणीची यंत्रणा मात्र उपलब्ध नाही.

कर्णमधुर आवाजासोबत हिरवा, गुलाबी व सोनेरी रंगांची उधळण करणारे हे फटाके वास्तवात विषारी धुरच सोडत असतात. हीच अवस्था पारंपरिक फटाक्यांचीही आहे. या फटाक्यांतून जस्त, तांबे, लोखंड, अल्युमिनियम, आदींचा वापर केला जातो. अशा धातुंच्या संयोगाने सल्फर डायऑक्साइड, पोटॅशियम नायट्रेट, बोरियमसारखे सजीव प्राण्यावर घातक व दुरगामी परिणाम करणारे घटक उत्सर्जित होतात. फटाक्यातील या विषारी घटकांचा व आवाजाचा सर्वाधिक परिणाम हृदयावर होतो. फटाक्यातील या विषामुळे डोळ्यांचे विकार, झोप न लागणे, हृदय जोरात धडकणे, रक्तदाब, मळमळणे, आतडय़ांचा त्रास, किडनी व फुप्फुसाचे आजार उद्भवतात. फटाक्यापासून दूर राहण्याचा सल्ला तज्ञांनी यानिमित्ताने दिला आहे.
महापालिकेचं आवाहन पण…!
फटाके फोडताना नागरिकांनी आवाजीची तीव्रता सांभाळावी. मोठय़ा आवाजाचे फटाके फोडू नयेत. ध्वनी प्रदूषण टाळावे असे जाहीर आवाहन महापालिकेने केले आहे. दिवाळी दरम्यान फटाक्यातून होणाऱया आवाजाची तीव्रता मोजणारी यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र फटाके फोडल्यानंतर हवेत पसरणाऱया दुषित वातावरण आणि रासायनिक विषारी हवेतील घटकांमुळे होऊ शकणाऱया गंभीर आजारांबाबत प्रबोधन होण्याची गरज आहे.
………………
रासायनिक घटक
अल्युमिनिअम – अल्युमिनिअम चांदी आणि पांढरे फ्लेम आणि चमक येऊन स्पार्कलर्ससाठी आवश्यक घटक.
सुरमा – सुरवातीला फटाक्यात झगमगाट करतो.
बेरियम – हिरवा रंग तयार करण्यासह अस्थिर घटकांना स्थिर करतो.
कॅल्शियम – कॅल्शियम लवण नारंगी फटाके तयार करतात.
कार्बन – प्रणोदक म्हणून वापरला जातो.
क्लोरीन – फटाक्यांमध्ये क्लोरीन अनेक ऑक्सिडायझर्सचा एक महत्वाचा घटक आहे.
तांबे – कॉपर संयुगे आतिशबाजीमध्ये निळे रंग तयार करतात.
लोखंड – लोखंडाला स्पार्क तयार करण्यासाठी वापरले जाते. धातूचा उष्णता स्पार्कचे रंग ठरवते.
लिथियम – लिथियम एक धातू आहे ज्याचा वापर आतिशबाजीसाठी लाल रंग देण्यासाठी केला जातो. .
मॅग्नेशियम – फटाक्यांची संपूर्ण चमक सुधारते.
ऑक्सिजन – आतिषबाजीमध्ये ऑक्सिडायझर्स समाविष्ट होतात, जे पदार्थ ज्वलंत होण्याकरिता ऑक्सिजन निर्मिती करतात.
फॉस्फरस आणि सल्फर – फटक्यांसाठी इंधनाचा काम करतो.
पोटॅशियम- पोटॅशियम फायरवॉल मिश्रणावर ऑक्सिडायझ करण्यास मदत करतो.
सोडियम – पिळवा रंगासह चमक वाढवतो.
…………………..

फटाक्यांचे धोके
1 ऍल्युमिनीयम – फटाक्यांतील इतर धांतूसोबत जळणाऱया अल्युमिनियममुळे उच्च परिणामाचा टॉक्सिक वायू वातावरणात मिसळतो.
2 संयुगांचा परिणाम – एकत्रित जलणातून उत्सर्जित वायुंने किडनीवर परिणाम होतो. तसेच सुक्ष्म परिणामामुळे मेंदूचे विकास उद्भवतात.
3 सल्फर डाय ऑक्साइड – आतडे, फुप्फुस, कान व डोळ्यांना घातक आहे.
4 कोरियम – या अत्यंत विषारी वायूचा शरिराशी संबंध आल्याने दुरगामी व घातक परिणाम होतात.

Related Stories

कोल्हापूर : विवाहितेच्या छळप्रकरणी गडमुडशिंगीतील सहा जणांवर गुन्हा

Archana Banage

इचलकरंजी यंत्रमाग कारखान्यात शॉर्टसर्कीटनं आग; दोन कोटीचं नुकसान

Abhijeet Khandekar

आदित्यास्त्राने कट्टर शिवसैनिक चार्ज, समाजमाध्यमासह प्रत्यक्षात मिळणारा प्रतिसाद बंडखोरांचे खच्चिकरण करणारा

Rahul Gadkar

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

Archana Banage

संतापजनक: कोल्हापुरात पोलिसांनी मंत्र्यासाठी वाहनधारकावर उगारला हात

Archana Banage

महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याची शक्ती दे

Archana Banage