मासिक पाहणी अहवालामधून माहिती
नवी दिल्ली
स्पर्धात्मक वाढता दबाव, उच्च चलनवाढ आणि मागणीवर प्रतिकूल हवामान यामुळे जुलैमध्ये भारतातील सेवा क्षेत्रातील कामगिरी मंदावली असल्याची माहिती एका मासिक पाहणी अहवालामधून दिली आहे.
जागतिक एस ऍण्ड पी ग्लोबलचा भारत सेवा पीएमआय व्यवसायाचा वृद्धीदर निर्देशांक जुलैमध्ये घटून तो 55.5 झाला आहे. तो जूनमध्ये 59.2 राहिला होता. हा आकडा मागील चार महिन्यातील सर्वात कमी वृद्धीचा राहिला असल्याची नोंद करण्यात आली आहे. सलगपणे 12 वा महिना आहे, की ज्यामध्ये वृद्धीसह विस्तार झाला आहे. परचेजिंग मॅनेजर्स निर्देशांकाच्या माहितीनुसार 50 पेक्षा अधिक अंकांचा अर्थ आहे की या वृद्धीदराचा विस्तार झाला आहे.
ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थशास्त्राच्या संयुक्त संचालक पोलियाना डी लिमा यांनी सांगितले की, स्पर्धात्मक दबाव, उच्च चलनवाढ आणि प्रतिकूल हवामानामुळे मागणीवर परिणाम झाला आहे आणि परिणामी भारताची सेवा अर्थव्यवस्था लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे स्पष्ट केले आहे.