नवी दिल्ली
दूरसंचार उपकरण निर्मिती क्षेत्रातील कंपनी नोकिया यांनी आपला नवा लोगो सादर केला आहे. जवळपास आपल्या कारकिर्दीत 60 वर्षानंतर पहिल्यांदा लोगो बदलाचा निर्णय घेतला आहे. सदरचा लोगो हा विविध रंगांच्या म़िश्रणासह आहे. आगामी काळात गतीने विकास साध्य करण्याच्या प्रक्रियेअंतर्गत सदरचा नवा लोगो सादर करण्यात आला आहे.